अन्नसुरक्षा, अन्नस्वराज्य आणि तुटलेली नाती
अन्नसुरक्षेची चर्चा होताना बहुतेक वेळा उत्पादन, उपलब्धता आणि किंमत ह्या तीन मुद्द्यांभोवती विचार फिरताना दिसतो. एखाद्या देशात पुरेसे धान्यउत्पादन होते का, लोकांना अन्न परवडते का, आणि कुपोषणाची पातळी कितपत आहे, ह्या प्रश्नांच्या आधारे अन्नसुरक्षेचे मूल्यमापन केले जाते. ह्या प्रश्नांचे महत्त्व नाकारता येणार नाही; परंतु अन्नसुरक्षेचा विचार केवळ ह्या चौकटीत मर्यादित राहिल्यास काही मूलभूत प्रश्न दुर्लक्षित …